कमनशिबी फलंदाजांच्या यादीत निरोशन डिकवेला ‘टॉप’वर

Niroshan Dickwella

कोणत्याही फलंदाजासाठी शतक हे स्वप्न असतं. शतक झळकावणे ही त्याची स्वप्नपूर्ती असते आणि त्यासाठी ते झटत असतात..मेहनत करत असतात पण प्रत्येकाचंच स्वप्न साकार होतं असे नाही…काही जण तर असे कमनशिबी असतात की ते बिचारे बरेच अर्धशतकं झळकावतात पण शतक काही त्यांच्या नावावर लागत नाही. हो..कमनशिबीच म्हणायला हवं कारण जर 10-10 अर्धशतकं झळकावूनही एकसुध्दा शतक नावावर लागत नसेल तर कमनशिबीच म्हणायला हवं..अशा कमनशिबी फलंदाजांच्या यादीत श्रीलंंकेचा (Sri Lanka) यष्टीरक्षक फलंदाज निरोशन डिकवेला (Niroshan Dickwella) टॉपला जाऊन पोहचलाय.

वेस्ट इंडिजविरुध्दच्या नाॕर्थ साऊंड (North Sound) कसोटीत बुधवारी हा गडी दुसऱ्या डावात 96 धावांवर बाद झाला आणि त्याची शतकाची बोहोनी पुन्हा एकदा हुकली. यंदा जानेवारीतच इंग्लंडविरुध्दच्या गाॕल (Galle) कसोटीतही तो 92 धावांवर बाद झाला होता. याप्रकारे दोनच महिन्यात दोनदा शतकाच्या अगदी जवळ जाऊनही तो शतकापासून वंचित राहिलाय आणि आता कसोटी सामन्यांमध्ये 17 अर्धशतकं पण एकही शतक नाही असा तो शतकांच्या बाबतीत कमनशिबी फलंदाजांच्या यादीत टॉपवर पोहोचलाय. आता डिकवेलाच्या नावावर 42 कसोटीच्या 76 डावात 2291 धावा आहेत, 17 अर्धशतकंसुध्दा आहेत पण शतक एकही नाही.

त्याच्या या हुकलेल्या शतकाने दिवंगत चेतन चौहान (Chetan Chauhan) हे आता अशा फलंदाजात दुसऱ्या स्थानी आले. चौहान यांनीसुध्दा कसोटीत 16 अर्धशतकं झळकावली होती पण शतक काही त्यांच्या नावावर लागले नव्हते.

शतकापासून वंचित राहिलेल्या फलंदाजांची यादी बघू या..
अर्धशतकं – फलंदाज
17 ——— निरोशन डिकवाला (श्रीलंका)
16 ——— चेतन चौहान (भारत)
13 ——— केन मकाय (ऑस्ट्रेलिया)
12 ——— शेन वाॕर्न (ऑस्ट्रेलिया)
11 ——— ब्रुस लेयर्ड (ऑस्ट्रेलिया)
11 ——— डी.एल. मरे (वेस्ट इंडिज)

बाॕब सिम्पसन व ट्रॕव्हर गोडार्ड हेसुध्दा या यादीत आले असते पण त्यांच्या सुदैवानेप्रत्येकी 15 अर्धशतकं झळकावल्यावर ते कसोटी सामन्यात शतक आपल्या नावावर लावण्यात यशस्वी ठरले होते.डिकवेला अजुन खेळतोय. त्यामुळे तो शतक झळकावण्यासाठी आणखी किती सामने घेतो, तोवर आणखी किती अर्धशतकं आपल्या नावावर लावतो हेच बघायचे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER