निर्भयाच्या दोषींना २० मार्च रोजी फासावर लटकवणार

Nirbhaya Gang Rape

नवी दिल्ली : दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कारातील चारही आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. मात्र, मागील दोन महिन्यांपासून आरोपी फाशीपासून पळवाटा शोधत आहेत. आतापर्यंत चारही आरोपींनी फाशी टाळण्यासाठी दया याचिका सादर केल्या होत्या. त्यामुळे फाशीच्या शिक्षेची तारीख पे तारीखच ठरत आहे. अखेर पुन्हा न्यायालयाने त्या चार आरोपींच्या डेथ वॉरंटची तारीख निश्चित केली आहे.

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणातील चारही दोषींना २० मार्च रोजी फासावर लटकवण्यात येणार आहे. २० मार्च रोजी पहाटे ५.३० वाजता चौघांना तिहार जेलमध्ये फाशी देण्यात येईल. चारही दोषींची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळल्यानंतर दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने त्यांच्या फाशीबाबत नवा डेथ वॉरंट जारी केला. यानुसार पवन गुप्ता, मुकेश सिंह, अक्षय ठाकूर आणि विनय शर्मा या चारही जणांना २० मार्च २०२० रोजी पहाटे ५.३० वाजता फासावर लटकवण्यात येणार आहे.

उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौ-यासंदर्भात संजय राऊत – योगी आदित्यनाथ भेट

दरम्यान, पवन गुप्ता, मुकेश सिंह, अक्षय ठाकूर आणि विनय शर्मा ही चार दोषींची नावं आहेत. या प्रकरणातील राम सिंह नावाच्या आरोपीने तिहार तुरुंगातच आत्महत्या केली होती. याशिवाय एक आरोपी अल्पवयीन असल्याने, ज्युवेनाईल कोर्टाने त्याला तीन वर्षांची शिक्षा ठोठावत त्याची रवानगी बालसुधारगृहात केली होती. २०१५ रोजी त्याची सुटका झाली. त्यानंतर चारही दोषींनी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. परंतु, सुप्रीम कोर्टाने यांच्या पुनर्विचार याचिका फेटाळल्या होत्या.