अमिताभ बच्चनसोबत प्रथमच काम करणार नीना गुप्ता

Amitabh Bachchan - Neena Gupta - Rashmika Mandana - Maharastra Today
Amitabh Bachchan - Neena Gupta - Rashmika Mandana - Maharastra Today

अभिनेत्री नीना गुप्ताने (Neena Gupta) गेल्या दोन-तीन दशकांपासून बॉलिवूडमध्ये काम करीत असली तरी तिचे म्हणावे असे किंवा उल्लेख करावे असे सिनेमे फार नाहीत. १९८२ मध्ये नीना गुप्ताने ‘साथ साथ’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. त्यानंतर १९९४५ मध्ये ‘वोह छोकरी’ सिनेमातील भूमिकेसाठी सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार तिला मिळाला. त्यानंतर नीनाने अनेक सिनेमे आणि मालिका केल्या. अभिनयाचे विविध रंग दाखवणाऱ्या नीना गुप्ताने गेल्या दोन-तीन वर्षांपासून काही चांगल्या भूमिका केल्या आणि त्या वाखाणल्याही गेल्या. प्रख्यात अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत ‘गुडबाय’ सिनेमा साईन केल्याने आता पुन्हा एकदा नीना गुप्ता चर्चेत आली आहे. स्वतः नीना गुप्तानेही या अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्यास उत्सुक असल्याचे म्हटले आहे.

एकता कपूर (Ekta Kapoor) आणि रिलायंस गुडबाय नावाचा सिनेमा करणार असून यात अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका आहे. विकास बहल (Vikas Bahal) सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. या सिनेमाचा नुकताच मुहुर्त करण्यात आला होता. याची माहिती आम्ही तुम्हाला दिलीच होती. साऊथची रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या मुलीची भूमिका साकारीत आहे. अमिताभ बच्चन यांच्या पत्नीच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीचा शोध सुरु होता. हा शोध संपला असून नीना गुप्ताला अमिताभच्या पत्नीच्या भूमिकेसाठी साईन करण्यात आले आहे. अमिताभ बच्चन यांच्यासोबत नीना गुप्ताचा हा पहिलाच सिनेमा आहे. अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळत असल्याने नीना गुप्ता प्रचंड खुश आहे.

अमिताभ बच्चनही नीना गुप्ताच्या अभिनयाने प्रभावित आहेत. त्यामुळेच २०१८ मध्ये आलेल्या ‘बधाई हो’ सिनेमातील नीना गुप्ताचे काम बघून अमिताभ बच्चन यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात तिच्या अभिनयाची प्रशंसा करणारे पत्र पाठवले होते. नीना गुप्ता यांनी हे पत्र सोशल मीडियावर शेअरही केले होते.

नीना गुप्ताने तिच्या या सिनेमा आणि भूमिकेबाबत बोलताना सांगितले, ‘जेव्हा दिग्दर्शक विकास बहलने मला सिनेमाची स्क्रिप्ट ऐकवली तेव्हा मला ती खूपच आवडली. चांगली स्क्रिप्ट असल्याने आणि त्यातही अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळत असल्याने मी नकार देण्याचा प्रश्नच उद्बवत नव्हता. मी लगेचच सिनेमाला होकार दिला. अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यास मिळणे हे माझे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे. अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची माझी अनेक वर्षांपासूनची इच्छा होती ती आता पूर्ण होत आहे.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button