नीना गुप्ता म्हणते, लग्न केल्याशिवाय समाजात मान्यता मिळत नाही

Nina Gupta

नीना गुप्ताने (Nina Gupta) मोठ्या आणि छोट्या पडद्यावर विविध भूमिका साकारल्या आहेत. नुकतीच ती मुलगी मसाबासोबत ‘मसाबा मसाबा’ नावाच्या एका वेबसीरीजमध्येही आली आहे. वेस्ट इंडीजचा प्रख्यात क्रिकेटर व्हिव्हियन रिचर्डससोबत लिव्ह इनमध्ये राहून मसाबाला जन्म देण्याचे धाडस नीना गुप्ताने केले होते. तेव्हा हा खूप चर्चेचा विषय झाला होता. त्यानंतर काही वर्षांपूर्वी नीना गुप्ताने दिल्लीतील एक यशस्वी व्यावसायिक विवेक मेहरासोबत केले होते. परंतु हे लग्न जास्त काळ टिकले नाही. विवेक मेहरासोबत लग्न करण्याचा निर्णय मुलगी मसाबाला कसा सांगायचा असा प्रश्न तिच्या मनात येत होता.

याबाबत बोलताना नीना गुप्ताने सांगितले, खरे तर मसाबाला मला काही सांगावेच लागले नाही. 8 ते 10 वर्षांपासून विवेक घरी येत असल्याने मसाबाला विवेक कोण आहे ते चांगले ठाऊक ढाले होते. मसाबाला जेव्हा मी सांगितले की, मी आता लग्न करणार आहे तर मसाबाचा प्रश्न होता, लग्न करण्याची गरज काय आहे? तेव्हा मी मसाबाला समजावून सांगितले की, समाजाता राहायचे असेल तर लग्न करणे आवश्यक आहे. लग्नाशिवाय तुम्हाला समाजात प्रतिष्ठा मिळत नाही. मसाबाला माझे म्हणणे पटले की नाही ते ठाऊक नाही पण ती आमच्या लग्नाला तयार झाली होती. पण काही दिवसांपूर्वी जेव्हा मसाबाने तिचा पति मधु मंटेनाला घटस्फोट दिला तेव्हा मला आश्चर्य वाटले. दुःखही झाले. मुली स्वतंत्र झालेल्या असल्याने आजकाल लग्न टिकत नाहीत असेही नीनाने सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER