संजय राऊत यांना अजित पवारांना चोर ठरवायचे होते का? निलेश राणेंचा सवाल

Nilesh Rane question to Sanjay Raut over Ajit Pawar

मुंबई :-  अजित दादा (Ajit Pawar) मोठया पवारांच्या ड्रॉवरमधून पत्र चोरीत असताना त्या काळोख्या खोलीत ‘टॉर्च’ चा प्रकाश मारण्यासाठी व पत्र हाती येताच खिडकीतून पोबारा करण्यासाठी अजित पवारांबरोबर भाजपचे (BJP) कोण कोण लोक होते? असा सवाल शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनाच्या अग्रलेखातून उपस्थिती केला आहे . त्यानंतर आता भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे (Nilesh Rane) यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, संजय राऊत यांनी कधीच कोणाची वकिली करू नये. अजित पवारांची वकिली करायला गेले आणि त्यांच्या इज्जतीचा कचरा केला. अजित पवारांनी शपथविधीच्या समर्थनार्थ पत्र चोरलं पण टॉर्च मारला कोणी, हा प्रश्न विचारला होता. मुळात संजय राऊत यांना अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का?’, असा प्रश्न निलेश राणे यांनी विचारला आहे. ‘दुसरं, म्हणे अजित पवार चिरीमिरी खात नाही’, असे देखील निलेश राणे म्हणाले.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button