केम छो वरळी विचारणारा आमदार कुठे आहे? निलेश राणे यांचा वरळीकरांना सवाल,आदित्य ठाकरेंवर डागले टीकास्त्र

Nilesh Rane and Aditya Thackeray

मुंबई : तौक्ते चक्रीवादळाने (Touktae cyclone) महाराष्ट्रात थैमान घातले आहे . मुंबईसह उपनगरात मुसळधार हजेरी लावल्यामुळे झाडं कोसळून पडली होती. तर मुंबईत दोन दिवसापासून पावसाने देखील हजेरी लावली आहे. तर अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं देखील दृष्य पाहायला मिळत आहे. याच मुद्यावरून भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे (Nilesh Rane) यांनी पर्यावरण मंत्री आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर टीकास्त्र सोडले .

निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की,‘हे चित्र वरळी मतदारसंघाचं आहे. वरळीकर विचारतायत तो ‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे? ती मुंबई पॅटर्नची पतंग कुठे गेली? एका पावसात वरळी पॅटर्न लोकांना दिसेल, सगळीकडे थुकपट्टी करून चालत नाही.’, असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.

राणे यांनी शेअर केलेल्या त्या व्हिडीओमध्ये भर रस्त्यात पाणी साचलेलं दिसत आहे. त्यातून काही माणसं जाताना दिसत आहे. त्या माणसांच्या गुडघ्यापर्यंत पाणी भरलेलं आहे. वरळीतील घटनेवर निलेश राणे नेहमी ट्विट करत असतात. त्यावरून निलेश राणे नेहमी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना दिसतात. यावर आता आदित्य ठाकरे काय उत्तर देतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button