
मुंबई :- पुणे (Pune) असं आहे की इथं प्रत्येकाला सेटल व्हावं वाटतं. पण मी कोल्हापूरला परत जाणार आहे. विशेष करून मला विरोधकांना ही गोष्ट सांगायची आहे, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटलं. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला होता. सरकार नाही त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. तसेच परत जाईन म्हणायला त्यांना कोणी पुणेकरांनी बोलावलंही नव्हतं, असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या या टीकेला भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
धरणवीर उपमुख्यमंत्री जास्तचं बोलू लागले आहेत. स्वतःच्या मागे एक आमदार नाही, फक्त नशिबाने पद मिळालं ते सांभाळा नीट. बोलीचा भात आणि बोलाचीच कढी, फालतू टिपण्या देण्यापेक्षा महाराष्ट्राच्या हिताचे कार्यक्रम राबवा, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.
मराठा समाज तडफडतोय त्यांच्या आरक्षणासाठी पुढाकार घ्या हिंमत असेल तर, असं म्हणत निलेश राणे यांनी अजित पवारांनाच ललकारलं आहे.
धरणवीर उपमुख्यमंत्री ज्यास्तच बोलू लागले आहेत. स्वतःच्या मागे एक आमदार नाही, फक्त नशिबाने पद मिळालं ते सांभाळा नीट. बोलीचा भात आणि बोलाचीच कढी, फालतू टिपण्या देण्यापेक्षा महाराष्ट्राच्या हिताचे कार्यक्रम राबवा. मराठा समाज तडफडतोय त्यांच्या आरक्षणासाठी पुढाकार घ्या हिम्मत असेल तर.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 26, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला