ते ठाकरे सरकारचे मंत्री महाराष्ट्राचे जावई आहेत का? आव्हाड प्रकरणावरुन निलेश राणेंचा संताप

Jitendra Awhad-Nilesh Rane

मुंबई :- राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अनंत करमुसे नावाच्या एका युवकाला केलेल्या मारहाण प्रकरणात उच्च न्यायालयात राज्य सरकारने अनिल साखरे यांची विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नेमणूक केली असून प्रती सुनावणी त्यांना २ लाख ५० हजार रुपये दिले जाणार असल्याचा शासन निर्णय घेतला आहे, त्याला भाजपने (BJP) आक्षेप घेतला आहे.

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुंडगिरी करत अनंत करमुसे नावाच्या एका युवकाला केलेली मारहाण संपूर्ण महाराष्ट्राने बघितली आहे. या प्रकरणात राज्य सरकारने स्वतः.च्या खर्चाने वकिल दिला आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी दिला आहे. तर दुसरीकडे ठाकरे सरकारमध्ये मंत्री असलेले जितेंद्र आव्हाड महाराष्ट्राचे जावई आहेत का? असा प्रश्न उपस्थित करत भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी संताप व्यक्त केला आहे.

ठाकरे सरकारातील मंत्री महाराष्ट्राचे जावई आहेत काय? लफडी करायची यांनी आणि पैसे भरायचे महाराष्ट्राने. जनतेचा पैसा स्वतःच्या बापाचा पैसा असल्यासारखा उडवतायत. मुख्यमंत्री स्वतःच्या बापाचं स्मारक सरकारच्या पैशातून बांधतायत तर मंत्री वेगळं काय करणार, असे म्हणत निलेश राणे यांनी खोचक टीकाही केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button