आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही; निलेश राणेंनी कंगना रणौतला सुनावले

मुंबई : बॉलिवूड माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची (Mumbai police) भीती वाटते असं अभिनेत्री कंगना रणौतनं (Kangana Ranaut) म्हटलं होतं. यावरून आता माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी तिला कडक शब्दात सुनावलं आहे. आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही, असे निलेश राणे यांनी कंगनाला सुनावले आहे.

ही बातमी पण वाचा:- मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटते? संजय राऊतांना कंगनाचा टोमणा 

“दोन-तीन अधिकारी प्रेशरमध्ये आले म्हणजे संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट दोषी होत नाही. आम्हाला महाराष्ट्र पोलिसांवर अभिमान आहे. मुंबई पोलिसांवर बोलण्याइतकी राणावत (कंगना रनौत) कोण लागून गेली? अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियान प्रकरणात खरे आरोपी पकडण्याच्या समर्थनात आम्ही आहोत, पण आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही.” असं म्हणत निलेश राणे यांनी कंगना रणौतला खडे बोल सुनावले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER