राऊतांनी उड्या मारू नयेत; आम्ही स्वयंभू आहोत, आम्हाला ठाकरे सरकारची गरज नाही : निलेश राणे

nilesh-rane-save-deposit-vinayak-raut

मुंबई :-  खासदार विनायक राऊतांच्या (Vinayak Raut) आरोपाला माजी खासदार निलेश राणेंनी सडेतोड उत्तर दिले आहे. नारायण राणे मंत्री असताना शिवसेनेचे अनेक नेते उद्धव ठाकरे यांची कामं घेऊन भेटायला यायचे. बाळासाहेबांच्या शेवटच्या काळातसुद्धा नारायण राणेंना (Narayan Rane) फोन केला होता, असा गौप्यस्फोट माजी खासदार निलेश राणेंनी (Nilesh Rane) केला आहे.

“मिलिंद नार्वेकरांपासून ते एकनाथ शिंदेंपर्यंत सर्व शिवसेनेचे नेते भेटायला यायचे, याचे सीसीटीव्ही फुटेज आहेत. आता जे मंत्री आहेत, ते राणेसाहेबांकडे उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) किती कामे घेऊन यायचे त्याची माहिती आमच्याकडेसुद्धा आहे. बंद खोलीत कुणाला फोन करायची गरज नाही. त्यामुळे विनायक राऊतांनी उड्या मारू नयेत. आम्ही स्वयंभू आहोत. त्यामुळे आम्हाला ठाकरे सरकारची गरज नाही. ” असा घणाघात निलेश राणेंनी केला. “विनायक राऊत यांना चांगले ते दिसत नाही. मेडिकल कॉलेजची परवानगी मिळते. मेडिकल कौन्सिल  ऑफ इंडियाकडून परवानगी येते. मेडिकल कॉलेजच्या जमिनीसाठी आम्ही प्रायव्हेट कर्ज घेतलंय.

ही बातमी पण वाचा : नारायण राणेंना त्यांच्या मुलांपासूनच खरा धोका आहे : राऊतांच्या आरोप 

त्यावर हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज इथल्या परवानगीसाठी राज्य सरकारची गरज नाही. त्यामुळे शिवसेनेच्या पोटात का दुखतंय?” अशी बोचरी टीका निलेश राणेंनी केली. नारायण राणेंच्या मेडिकल कॉलेजला फडणवीसांनी परवानगी दिली नाही म्हणून राणे दोन महिन्यांपूर्वी मातोश्रीवर दिवसातून तीन तीन वेळा फोन करत होते. अखेर उद्धव ठाकरेंनी कोकणात मेडिकल कॉलेज होत असल्यामुळे परवानगी दिली असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले होते . याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणेंनी राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे.

ही बातमी पण वाचा : नारायण राणेंना त्यांच्या मुलांपासूनच खरा धोका आहे : राऊतांच्या आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER