राज्य सरकारातला एक मंत्री जिरवायची भाषा करतो हे योग्य नाही : निलेश राणे

मुंबई : समाजात भांडण लावून महाराष्ट्र संकटात आणण्याचं काम कुणीही करू नये. राज्य सरकारातला एक मंत्री जिरवायची भाषा करतो हे योग्य नाही, असं म्हणत भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी काँग्रेसचे (Congress) नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवारांवर (Vijay Vadettiwar) नाव न घेता निशाणा साधला आहे.

समाजात भांडण लावून महाराष्ट्र संकटात आणण्याचे काम कुणीही करू नये. राज्य सरकारातला एक मंत्री जिरवायची भाषा करतो हे योग्य नाही. कुठल्या समाजाला काय मिळेल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या अधिकारानुसारच मिळेल. कुठल्याही मंत्र्याने विचार करून बोलले पाहिजे, असे निलेश राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत .

दरम्यान, मी जेथे संधी मिळेल तेथे ओबीसी समाजाचा आवाज उचलून धरणार. पक्ष, जात विसरून फक्त आणि फक्त ओबीसी म्हणून उभा असल्याचंही वडेट्टीवारांनी म्हटले होते .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER