…मग ठाकरे सरकार गोट्या खेळायला बसलंय का? – निलेश राणे

Nilesh Rane & Kishori pednekar

मुंबई : दिवाळीत प्रार्थनास्थळे उघडल्यामुळे कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली, या शिवसेना (Shivsena) नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या वक्तव्यावरुन भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. या वादात आता निलेश राणे यांनीही उडी घेतली आहे. शिवसेनेत सगळेच एकापेक्षा एक विद्वान असल्याचा टोला त्यांनी लगावला. सर्वात अगोदर दारूची दुकाने उघडली, दारुमुळे किती कोरोना रुग्ण बरे झाले अगोदर ती यादी जाहीर करा, अशी मागणीही निलेश (Nilesh Rane) राणे यांनी केली.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याचा इशारा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शुक्रवारी दिला होता. यावेळी त्यांनी शाळा आणि लोकल ट्रेन इतक्यात सुरु करू नयेत, असे सांगितले होते. तसेच दिवाळीत प्रार्थनास्थळे उघडल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढायला लागल्याचेही त्यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी ट्विट करुन राज्य सरकारच समाचार घेतला आहे. ‘अगोदर माझं कुटुंब माझी जबाबदारी, आता माझं लाईट बिल माझी जबाबदारी. ठाकरे सरकार सुधरणार नाही. प्रत्येक गोष्ट लोकांची जबाबदारी तर ठाकरे सरकार काय गोट्या खेळायला बसलंय काय’?, असा सवाल निलेश राणे यांनी विचारला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER