स्वत:चे आमदार टिकवता आले नाही ते परत निवडून आणण्याची भाषा करतात – निलेश राणे

AJit Pawar & NilEsh Rane

मुंबई :- जे आमदार भाजपात (BJP) गेले आहेत त्यांनी परत यावे, त्यांना निवडून आणू, असे आवाहन उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले आहे. यावर भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी अजित पवारांना टोमणा मारला – शपथविधीनंतर स्वतःचे आमदार टिकवता आले नाही. ते आमदारांना परत निवडून आणण्याची भाषा करत आहेत! या संदर्भात उल्लेखनीय आहे की, गेल्या वर्षी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याच्या आधी अजित पवार यांच्या  पाठिंब्याने देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी सरकार स्थापन केले होते; पण नंतर अजित पवार राष्ट्रवादीत परत शरद पवारांसोबत गेल्याने ते सरकार लगेच कोसळले होते.

ही बातमी पण वाचा : सरकारचे सल्लागार कोण हे समजत नाही, सगळ बुडवायला निघाले – फडणवीस

यावरून निलेश राणे यांनी अजित पवारांना, शपथविधीनंतर स्वतःचे आमदार टिकवता आले नाहीत, असा टोमणा मारला. मागच्या वर्षात विरोधकांच्या कुंडल्या बघणारे आणि गेल्या वर्षभरात सरकार पाडण्याचा मुहूर्त पाहणारे आता पुस्तके आणि अहवाल वाचू लागले आहेत, असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात केले. भाजपच्या नेत्यांनी गेल्या वर्षभरात अनेकदा महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल, असे  भाकीत  केले होते. त्याच वेळी, भाजपाचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसची काही नेतेमंडळी वर्षभर करत आहेत. अजित पवार यांनीदेखील याबाबत एक वक्तव्य केले. त्यावरून नेते निलेश राणे यांनी अजित पवारांना टोमणा मारला. निलेश राणे यांनी ट्विटरवरून अजित पवार यांच्यावर टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनेकदा सांगतात की, भाजपाचे २० ते २५ आमदार आमच्या संपर्कात आहेत. तुमच्या सरकारला आता सत्तेवर येऊन १२ महिने झाले. तुम्ही अद्याप भाजपाचा एकही आमदार फोडू शकला नाहीत. तुमच्यात ताकद असेल तर प्रयत्न करत राहा. तुम्ही दगडावर कितीही डोके आपटले, तरी भाजपाचा एकही आमदार फोडणे तुम्हाला जमायचे नाही, असे आव्हान त्यांनी अजित पवारांना दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER