…तर उद्धव ठाकरेंचे जगात कारखाने असते; निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई :- राज्यात आलेल्या तौक्ते वादळामुळे (Cyclone Tauktae) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळाचा सर्वांत मोठा फटका कोकणाला बसला असून, अद्यापही  सरकारी मदत जाहीर झालेली नाही. त्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. कोकण किनारपट्टीवरील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. अनेकांच्या घरांची पत्रे उडाली. घरातील नुकसान झाले. त्यानंतर प्रशासनाकडून या सर्व नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह अधिकारी दाखल झाले होते.

तौक्ते वादळाने नुकसान झालेल्यांना लवकरच मदत जाहीर करू, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी कोकण दौऱ्यावेळी दिले होते. मात्र अद्यापही सरकारी मदत जाहीर झालेली नाही. आणि याच मुद्द्यावरून माजी खासदार आणि भाजपा सचिव निलेश राणे (Nilesh Rane) यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. अजून एक पोकळ आश्वासन…पोकळ आश्वासनांचा जर धंदा असता तर उद्धव ठाकरेंचे जगात कारखाने असते. १० दिवस झाले एक कवडी दिली नाही, अनेक गावांत  अजूनही लाईट नाही, रॉ मटेरियल नाही, पण ठाकरे सरकार फक्त ज्योतिषीसारखे तारखा देत आहेत, असा टोला निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर लगावला.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button