‘आखिर तुम कहना क्या चाहते हो?’ उद्धव ठाकरेंना टोला मारत निलेश राणेंना आठवला 3 इडियट्सचा डायलॉग

Nilesh Rane and uddhav tahckeray

मुंबई : महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाच्या (Corona Crises) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्हद्वारे १५ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता १४ एप्रिल रात्री ८ वाजल्यापासून १५ दिवस राज्यात कलम १४४ लागू केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर भाजप प्रदेश सचिव निलेश राणे (Nilesh Rane) यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांना कितीही वेळा ऐकलं तरी काहीही समजत नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाहून मला 3 इडियट्सचा मधला ‘तुम कहना क्या चाहते हो?’ हा डायलॉग आठवतो, असा टोला निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी जनतेशी संवाद साधताना राज्यातील कोरोना परिस्थितीचा अहवाल मांडला. त्यानंतर त्यांनी राज्यात संचारबंदीची घोषणा केली होती. त्यामुळे त्यांचे हे भाषण लांबलचक झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button