…यासाठी शिवसेनेला भारतरत्न दिले पाहिजे : निलेश राणे

मुंबई :- भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर (Shivsena) निशाणा साधला आहे. शिवसेनेला भारतरत्न (Bharat Ratna) दिले पाहिजे असा टोला त्यांनी लगावला आहे. “प्रकल्पाला अगोदर विरोध करायचा आणि सेटलमेंट झाल्यानंतर स्थानिकांचा विरोध मावळला सांगून प्रकल्पाचे समर्थन करायचे . हेच धंदे करत करत इथपर्यंत आले “, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.

राज्यात बुधवारी नाणार आणि जैतापूर प्रकल्पावरुन पुन्हा एकदा चर्चा रंगलेली पहायला मिळाली. शिवसेनेचे लांजा – राजापूर मतदार संघातील आमदार राजन साळवी यांनी केलेलं वक्तव्य यासाठी कारणीभूत ठरलं. “सध्या कोकणात उद्योगधंदे नाहीत. स्थानिकांनी पाठिंबा दिल्यास नाणारबाबत आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) सकारात्मक भूमिका घेईल, असे विधान राजन साळवी यांनी एबीपी माझाशी बोलताना केले होते. मात्र नंतर यावर थेट मातोश्रीवरुन खुलासा करण्याची वेळ आली. दरम्यान विरोधकांनी यावरुन शिवसेनेवर टीका केली आहे.

ही बातमी पण वाचा : …यासाठी शिवसेनेला भारतरत्न दिले पाहिजे :  निलेश राणे 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER