शरजील उस्मानीला भर चौकात ओल्या बांबूचे फटके दिले पाहिजे : निलेश राणे

मुंबई : पुण्यात एल्गार परिषदेत शरजील उस्मानी (Elgar Conference in Pune) याने हिंदूंबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्याच्यावर सर्व स्तरावरून टीका होत आहे . अशातच भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शरजील उस्मानीवर (Sharjeel Usmani) निशाणा साधला आहे.

एक हरामी सर्जील उस्मानी हिंदू समाजावर टीका करतो पण त्याच्यावर फक्त एफआयआर दाखल केला जातो. त्याला भर चौकात ओल्या बांबूचे फटके दिले पाहिजे. परत कुठल्या हरमीची हिम्मत होणार नाही हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने बघायची, अशा शब्दात निलेश राणेंनी टीका केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे.

भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही शरजील उस्मानीला अटक करण्याची मागणी केली आहे. उस्मानीच्या या वक्तव्यावर राज्यातील नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, आजचा हिंदू समाज सगळैा सडलेला आहे. हिंदू समाद हत्या करतो. घरी जाऊन अंघोळ करतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा हत्या करतो, असं शरजील उस्मानी एल्गार परिषदेत बोलला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER