संज्याची राज्याबाहेर जाऊन लाज घालवायची सवय जात नाही, निलेश राणेंचा टोमणा

मुंबई : शिवसेनेने (Shivsena) पश्चिम बंगालच्या निवडणुकीत उतरण्याची घोषणा केली. शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी रविवारी हि माहिती दिली. यावर भाजपाचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शिवसेनेला टोमणा मारला “महाराष्ट्रात शिवसेनेला २०१९ मध्ये युती करून सुद्धा फक्त १६% मतं मिळाली पण संज्याची राज्याबाहेर जाऊन लाज घालवायची सवय जात नाही,”

याआधी शिवसेना बिहार आणि गोव्यातही निवडणूक लढली आहे. डिपॉझिट जप्त झाले. निलेश राणे यांनी शिवसेनेनं निवडणुका लढवलेल्या ठिकाणची आकडेवारीदेखील ट्विटमध्ये दिली आहे. – “बिहार निवडणुक – नोटा १.६८%, शिवसेनेला ०.०५% मतं, गोवा निवडणुक – शिवसेनेनं ४० पैकी फक्त ३ उमेदवार उभे केले आणि त्या ३ उमेदवारांची एकूण मतं ७९२. महाराष्ट्रात शिवसेनेला २०१९ मध्ये युती करून सुद्धा फक्त १६% मतं मिळाली. पण संजय राऊतांची राज्याबाहेर जाऊन लाज घालवायची सवय जात नाही,”

“शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेअंती पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका लढविण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. आम्ही लवकरच कोलकात्यात दाखल होऊ. जय हिंद, जय बांगला’,” असे ट्वीट करत संजय राऊत यांनी बंगालमध्ये निवडणूक लढण्याची माहिती दिली आहे.

सर्व ठिकाणी डिपॉझिट जप्त !

यापूर्वी शिवसेनेने उत्तर प्रदेशसह गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आदी राज्यांत निवडणूक रिंगणात उमेदवार उतरवले होते. अलीकडेच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत धनुष्यबाण चिन्हावरून वाद झाल्याने तुतारी वाजविणाऱ्या मावळ्याचे चिन्ह घेऊन शिवसेनेने २२ उमेदवार दिले होते. मात्र, एकाही जागी शिवसेनेला डिपॉझिटही राखता आले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER