आरक्षणासाठी शिवसेनेचं योगदान काय? संज्या तू पवार साहेबांची भांडी घासत रहा’-निलेश राणे

Nilesh Rane

मुंबई :- बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द करण्याचा महत्वपूर्ण आणि तितकाच धक्कादायक निकाल दिला. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज प्रतिक्रिया दिली. विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर राजकारण न करता आरक्षण कश्याप्रकारे मिळवता येईल यासाठी पुढे यावे. महाराष्ट्र सरकारला अधिकार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाच निरीक्षण आहे. आम्ही हा कायदा मंजूर करण्यासाठी राष्ट्रपतींकडे, केंद्राकडे जाऊ. देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आमच्यासोबत यावं, त्यांनी नेतृत्व करावं, असं आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले. त्यावर आता माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी संजय राऊतांचा समाचार घेतला आहे.

‘संज्या राऊतला अधिकार काय मराठा समाजाच्या विषयावर बोलण्याचा? ज्या माणसाने मराठा समाजाची खिल्ली उडवली आणि आजपर्यंत माफी मागितली नाही तो माणूस मराठा आरक्षणाबद्दल बोलतोय. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी काय योगदान आहे शिवसेनेचं? आम्ही आमचं बघून घेऊ संज्या तू पवार साहेबांची भांडी घासत रहा’, अशी खरमरीत टीका निलेश राणे यांनी केली संजय राऊत यांच्यावर केली आहे.

ही बातमी पण वाचा : ‘आरक्षणासाठी फडणवीसांनी आमच्यासोबत यावं, त्यांनी नेतृत्व करावं’, संजय राऊतांचे आवाहन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button