संजय राऊतांनी नगरपरिषदेत निवडून यावं, मग बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर बोलावं : निलेश राणे

Nilesh Rane - Sanjay Raut

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एका नगरपरिषदेच्या निवडणुकीत निवडून येऊन दाखवावे . बिहारच्या (Bihar) मुख्यमंत्रिपदावर बोलायचा शिवसेनेला (Shiv Sena) अधिकार काय? असा सवाल माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी उपस्थित केला आहे .

बिहार निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील चित्र बदलायलाही वेळ लागणार नाही. कारण महाविकास आघाडीबाबत (Mahavikas Aghadi) असंतोष आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये हे चित्र दिसेल, असे निलेश राणे म्हणाले.

बिहार निवडणुकीमध्ये शिवसेनेला ‘नोटा’पेक्षाही कमी मतदान झालं आहे. स्वतःचा कचरा कसा करायचा, यावर शिवसेनेने पीएचडी केली आहे. बिहार निवडणुकीमध्ये शिवसेनेचा देशभरात कचरा झाला. इकडे तिकडे स्वतःचा कचरा करण्यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेची कामं करावीत असेही राणे म्हणाले .

ज्या राज्यात शिवसेना उभी राहते, त्या राज्यात शिवसेनेचा पराभव होतो. आता तरी शिवसेनेने यातून धडा घ्यावा आणि महाराष्ट्रावर लक्ष्य केंद्रीत करावे , असा सल्लाही निलेश राणेंनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER