ठाकरे सरकार म्हणजे नुसते बोलबच्चन, मंत्रालयही दिल्लीत हलवा : निलेश राणे

Nilesh Rane & Uddhav Thackeray

मुंबई : भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) टीका केली आहे. हे नुसतं बोलबच्चन सरकार आहे. प्रत्येक वेळी केंद्राकडे बोट दाखवलं जात आहे. केंद्राकडेच बोट दाखवायचे असेल तर मंत्रालयही दिल्लीला हलवा, अशी टीका राणे यांनी केली आहे .

निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले की , ठाकरे सरकार म्हणजे बोलाचा भात आणि बोलाची कढी. नुसतं बोलबच्चन. पंचनामे झाले आता पुढे काय? आम्ही शेतकऱ्यांसाठी कर्ज काढू सांगणारे ठाकरे सरकारचे मंत्री कुठे गेले? प्रत्येक वेळेला केंद्राकडे बोट दाखवायचे असेल तर मंत्रालय पण दिल्लीला हलवा, अशी टीका त्यांनी केली आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे.

या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासून (CM Uddhav Thackeray) राज्यातील अनेक मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दहा हजार कोटीचं पॅकेजही जाहीर केलं होतं. मात्र, शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नसल्याचा दावा निलेश राणे यांनी केला आहे .


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER