बाप मुख्यमंत्री, स्वतः कॅबिनेट मंत्री तरी लोक दुसऱ्या पक्षात चालले आहेत; निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला

Nilesh rane-Aditya Thackera-Uddhav Thackeray

मुंबई :  ठाकरे सरकारमधील पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या वरळी मतदारसंघातील नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेतला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत शेकडो नागरिकांनी मनसेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे . शिवसेनाप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे चिरंजीव व कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील नागरिकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात मनसे (MNS) प्रवेश केल्याने राजकारणात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.

भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनीदेखील ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “वरळी मतदारसंघातले शेकडो शिवसैनिक दुसऱ्या पक्षात गेले. बाप मुख्यमंत्री, स्वतः कॅबिनेट मंत्री, मतदारसंघात दोन  माजी आमदार तरीही मोठ्या प्रमाणात लोक शिवसेना सोडून दुसऱ्या पक्षात चालले आहेत. मुंबईच्या वरळी मतदारसंघात सामान्य लोक स्थानिक आमदाराच्या नावाने शिव्या घालत आहेत.” अशी टीका निलेश राणेंनी केली आहे.

ही बातमी पण वाचा :ना पवार, ना ठाकरे, महाराष्ट्रातील जनता हाच महाराष्ट्राचा ब्रँड- उदयनराजे भोसले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER