फडणवीस आले म्हणून नाईलाजाने मुख्यमंत्र्यांना कोकणात यावं लागलं, निलेश राणेंचा टोमणा

Maharashtra Today

सिंधुदुर्ग : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)हे आज एक दिवसीय कोकण दौऱ्यावर आले आहेत. या दरम्यान ते रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत. तर दुसरीकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मागील तीन दिवसांपासून कोकणच्या दौऱ्यावर आहेत. मागच्या दोन दिवसात त्यांनी कोकणातील अनेक जिल्ह्यांना भेट झालेल्या नुकसानीची पाहणी करत नुकसानग्रस्तांना दिलासा दिला. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री केवळ एक दिवसाचा दौरा करत आहेत, तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. आणि याच मुद्द्यावरून माजी खासदार निलेश राणे(Nilesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.

‘माध्यमांना देखील खरं वाटत नाही की उद्धव ठाकरे घराबाहेर पडले, सतत उद्धव ठाकरे कुठे पोहोचले याचा पाठलाग सुरू आहे. उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा म्हणजे नारळावर अक्षता टाकणं. फडणवीस साहेब कोकण दौऱ्यावर आले म्हणून झक मारत मुख्यमंत्र्यांना यावं लागलं, ही औपचारिकता आहे, दुसरं काही नाही’, असे म्हणत निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button