संज्या 99 टक्के शिवसैनिकांना खटकतो : निलेश राणेंचा टोला

Nilesh Rane-sanjay-raut

मुंबई :केंद्र सरकार कृषि क्षेत्राशी संबंधित तीन विधेयक संसदेत मांडली असून, त्यापैकी दोन विधेयके संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आली आहे.मात्र, या विधेयकासंदर्भात शिवसेनेने (Shivsena) संसदेच्या दोन्ही सभागृहात वेगवेगळी भूमिका घेतल्याने भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्यानंतर आता कृषी विधेयकांवर शिवसेनेनं लोकसभा आणि राज्यसभेत वेगळी भूमिका घेतली आहे. लोकसभेत पाठिंबा दिला तर राज्यसभेत विरोध केला आहे. याचं कारण शिवसेनेचे लोकसभेतील खासदार संजय राऊत यांना किंमत देत नाहीत आणि नेता मनात नाहीत . संज्या ९९% शिवसैनिकांना खटकतो म्हणून संधी मिळेल तेव्हा ते संज्याला फाट्यावर मारतात आणि पक्ष भूमिका राहते बाजूला, अशी टीका निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER