‘सत्तेत राहून काँग्रेसचा काय फायदा, इज्जत आहे कुठे’? निलेश राणेंचा काँग्रेसला टोला

मुंबई :- आज शिवसेनेचे (Shivsena) मुखपत्र असलेल्या सामानातून काँग्रेसला (Congress) लक्ष्य करण्यात आले आहे. नुकताच संपन्न झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला मिळालेल्या पराभवावरुन शिवसेनेने म्हटले की, देशात कोरोनाचे संकट आहे. हे कारण देऊन काँग्रेस अध्यक्षपदाची निवड सलग तिसऱ्यांदा टाळण्यात आली. त्यामुळे सोनिया गांधी (Sonia Gandhi) याच पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून काम पाहत राहतील. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडल्यापासून ते रिकामेच आहेत. आणि शिवसेनेने केलेल्या या विधानावरुन भाजप नेते निलेश राणेंनी (Nilesh Rane) काँग्रेसला खोचक टोला लगावला आहे.

‘इतक्या शेलक्या शब्दात काँग्रेसच्या विरोधकांनी सुद्धा राहुल गांधी (Rahul Gandhi) बद्दल असे शब्द काढले नसतील जे सत्तेमध्ये सोबत राहून शिवसेनेने वापरले. संजय राऊत व उद्धव ठाकरे कोणाचेच नाही. तोंडावर गोड पण आतून महा कपटी त्यांचा मूळ स्वभाव आहे. काँग्रेसचा सत्तेत राहून काय फायदा, इज्जत कुठे आहे??, असा मिस्कील टोला निलेश राणे यांनी काँग्रेसला हाणला आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button