पवारसाहेबांनी हे ‘कॅरॅक्टर’ बाहेर काढल्यापासून लोक राहुल गांधीला विसरले; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोमणा

मुंबई : पवारसाहेबांनी हे ‘कॅरॅक्टर’ बाहेर काढले तेव्हापासून लोक राहुल गांधीला (Rahul Gandhi) विसरलेत, असा टोमणा भाजपाचे (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी उद्धव ठाकरे याना मारला आहे. निमित्त आहे ठाकरे यांचा हिंदी-मराठीच्या मिसळ भाषणाचे.

एका बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काही वाक्य हिंदीत तर काही मराठीत बोलत होते. नेहमी उद्धव ठाकरेंवर टीका करणारे भाजपचे नेते निलेश राणे यांनी त्या भाषणाचा व्हिडीओ ट्विट केला आणि ठाकरे यांची राहुल गांधी यांच्याशी तुलना करून टोमणा मारला पवारसाहेबांनी हे कॅरॅक्टर बाहेर काढले तेव्हापासून लोक राहुल गांधीला विसरलेत!

राणे यांनी ट्विट केले आहे – मराठी हिंदी मिक्स भाषण… भाषेचे सोडा ह्या मुख्यमंत्र्यांना काहीच धड येत नाही. पवार साहेब, कोणाला बसवले महाराष्ट्राच्या डोक्यावर तुम्ही, तुम्हाला ही पश्चाताप होत असेल. लोक राहुल गांधीला विसरले जेव्हापासून पवारसाहेबांनी हे कॅरॅक्टर बाहेर काढले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER