आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही; निलेश राणेंचा घणाघात

मुंबई :- सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मराठा आरक्षण (Maratha reservation) कायदा रद्द केला आहे. आरक्षणाविषयी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. आरक्षणप्रश्नी पुढाकार घेण्याची गरज आहे, असे संभाजीराजे यांनी शरद पवारांना सांगितले. तसेच उद्या मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray) आणि विरोधी पक्षनेत्यांसोबत चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत खासदार निलेश राणे यांनी ट्विट केले आहे.

संभाजीराजे (Sambhaji Raje) म्हणाले की, “एकंदरीत मराठा समाजाची खदखद, त्यांची परिस्थिती पवारांच्या कानावर घातली. या प्रश्नी तुम्ही पुढाकार घेण्याची गरज आहे. मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते या सगळ्यांनी एकत्र येऊन मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची भूमिका घ्यायला हवी.”

संभाजीराजेंच्या या भेटीनंतर भाजपचे नेते निलेश राणे यांनी ट्विट केले आहे. निलेश राणे (Nilesh Rane) म्हणाले की, “संभाजीराजेंच्या मनात काय भलतच दिसतयं. पवार साहेब व महाविकास आघाडीच्या जवळ जायचं असेल तर खुशाल जावं. पण मराठा आरक्षणाचा विषय स्वतःसाठी वापरू नका. राजे, वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही.”

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button