मुंबईचे सहपोलीस आयुक्त एका बलात्काराच्या मॅटरसाठी एका पक्षाच्या नेत्याला कसे भेटू शकतात? निलेश राणेंची टीका

vishwas nangre patil & Sharad Pawar & Nilesh Rane

मुंबई : भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली.  यावर आक्षेप नोंदवला आहे. शरद पवार आणि विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांच्या भेटीवर निलेश राणेंनी ट्विट करून प्रश्न विचारले आहेत.

काय चाललंय महाराष्ट्रात?  मुंबईचे सहपोलीस आयुक्त एका बलात्काराच्या मॅटरसाठी एका पक्षाच्या नेत्याला कसे भेटू शकतात? आणि ते पण त्यांच्या घरी?  हा तर केस झाकायचा अजेंडा दिसतो. अशाने  पोलिसांवर विश्वास उडेल लोकांचा… सामान्य लोकांसाठी ही सुविधा आहे का, हे पण आयुक्तांनी सांगावं, असे राणे म्हणाले . निलेश राणेंनी विश्वास नांगरे पाटील यांच्या भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

मुंबईचे सहपोलीस आयुक्त बलात्काराच्या मॅटरसाठी एका पक्षाच्या नेत्याला त्यांच्या घरी कसे भेटू शकतात, हा प्रश्न विचारला. हा प्रकार केस झाकण्यासाठीचा अजेंडा दिसतो, अशा घटनांमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास उडेल, असंही निलेश राणे म्हणाले. सामान्य नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे का? असा सवालही ही निलेश राणेंनी उपस्थित केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER