शिवभोजन सेंटर सुरू; कारण ते शिवसेना कार्यकर्त्यांचे, इतरांचे काय? निलेश राणेंचा सवाल

Shivbhojan Thali-CM Thackeray-Nilesh Rane

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट (Corona Crises) वाढतच चालले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. या काळात संचारबंदी आदेशासह कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. लॉकडाऊनची घोषणा करताना मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray) यांनी हातावर पोट असणाऱ्यांसाठी एक आर्थिक पॅकेजही जाहीर केलंय. हे पॅकेज म्हणजे गरिबांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार असल्याची टीका भाजपकडून करण्यात आलीय. आता माजी खासदार आणि भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनीही ठाकरे सरकारवर (Thackeray Govt) जोरदार टीका केली.

लॉकडाऊनच्या काळात शिवभोजन केंद्र सुरू राहणार आहेत. शिवभोजन थाळी मोफत दिली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलीय. यावरून निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. शिवभोजन सेंटर उघडी राहणार; कारण शिवसेनेचे कार्यकर्ते सेंटर चालवतात, पण इतरांचे रेस्टॉरंट बंद राहणार. घराबाहेर जाऊन पार्सल घ्या, कोरोना होणार नाही. रिक्षा टॅक्सी फिरू द्या; पण तुम्ही फिरू नका. मुंबईच्या बिल्डरांना मदत करताना हजार कोटी; पण गरिबांना मदत करताना पाचशे-हजार, असे ट्विट करत निलेश राणे यांनी राज्य सरकारच्या लॉकडाऊनच्या निर्णयावर टीका केली.

ही बातमी पण वाचा : आखिर तुम केहना क्या चाहते हो? उद्धव ठाकरेंना टोला मारत निलेश राणेंना आठवला 3 इडियट्सचा डायलाॅग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button