विनायक राऊत मातोश्रीवरचा चप्पलचोर – निलेश राणे

मुंबई : अमित शाह (Amit Shah) यांच्या कोकण दौऱ्यानंतर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinyak Raut) आणि राणे यांच्या वाद सुरू झाला आहे. या वादात नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शेलक्या शब्दात राऊतांवर टीका केली. म्हणालेत, विनायक राऊत मातोश्रीवरचा चप्पलचोर आणि ‘थापे’बाज आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या हट्टामुळे शिवसेना-भाजपाची युती तुटली. अमित शाह विश्वासघातकी आहेत, असे विनायक राऊत म्हणालेत. या टीकेला निलेश राणे यांनी एक व्हिडीओ ट्विट करुन प्रत्युत्तर दिले; व्हिडीओत निलेश राणे यांनी विनायक राऊत यांचा शेलक्या शब्दांत उद्धार केला.

विनायक राऊत खासदारपदाच्या लायकीची व्यक्ती नाही. संसदेत काय बोलायचे हेदेखील त्यांना कळत नाही. केवळ लाट होती म्हणून ते कोकणातून निवडून आले. राऊत यांना आव्हान देताना निलेश राणे म्हणालेत, विनायक राऊत यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी या क्षणाला खासदाराकीचा राजीनामा देऊन निवडणूक लढवून दाखवावी. त्यांना किती मते मिळतात, हे पाहू. विनायक राऊत यांच्यात तेवढी हिंमत नाही. पण, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही त्यांचा बंदोबस्त करु, राऊतांना कोकणातून हद्दपार करू.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER