आमदारांचे लाड पुरवण्यासाठी भीक मागणाऱ्या ठाकरे सरकारकडे ९०० कोटी’ – निलेश राणे

मुंबई :- महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक वाढल्याचे दिसून येत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी राज्यभर लॉकडाऊन, कडक निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट झाली आहे. अशातच मागील दोन ते तीन महिन्यांपासून राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढून सरकारची चिंता वाढली आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, केंद्र सरकारने महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला मदत करावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वेळोवेळी केली जात आहे. सोबतच ऑक्सिजन, औषधे, व्हेन्टिलेटर्स पुरवण्याची मागणीही केली जात आहे. यावरुन भाजपचे नेते ठाकरे सरकारला (Thackeray Govt.) कोंडीत पकडण्याच्या प्रयत्नात आहेत.

आज माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विट करत ठाकरे सरकारला कोंडीत पकडले आहे. ‘लहान लहान विषयासाठी केंद्र सरकारकडे भीक मागणाऱ्या ठाकरे सरकारकडे आमदारांसाठी फाइव्हस्टार निवास बांधण्यासाठी ९०० कोटी रुपये आहेत. कोरोनाचं संकट दाखवत लोकांना फुटपाथवर यायची पाळी राज्य सरकारने आणली पण आमदारांचे ह्या काळात सुद्धा राज्य सरकार लाड करायला विसरली नाही’, अशी टीका निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

तसेच निलेश राणे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन एक व्हिडीओ शेअर करत राज्य सरकारवर निशाणा साधला. ‘ठाकरे सरकारने मराठा समाजाशी गद्दारी केली आहे. मराठ्यांनो आता जर खरं ओळखायला मागे पडाल तर इतिहासामध्ये २२ व्या शतकातले मराठे शोधून सापडणार नाहीत’, असे म्हणत त्यांनी निशाणा साधला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.