
मुंबई :- पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) लवकरच होत असलेल्या विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे.सद्या, पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसचे सरकार आहे. बिहार निवडणुकांनंतर पश्चिम बंगालमध्ये देखील निवडणूक लढवणार असल्याची चर्चा शिवसेनेच्या गोटात सुरू होती. एवढच नाही तर शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे बंगालच्या दौऱ्यावर जाणार असल्याचं देखील सांगितलं जात होतं.
मात्र आता, शिवसेना नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बंगालच्या निवडणुकांबाबतची पक्षाची भूमिका जाहीर केली आहे. त्यांनी ममता बॅनर्जी यांना शिवसेनेचा पाठींबा असल्याचं सांगत शिवसेना निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा त्यांनी केली. याबाबत त्यांनी एक ट्विट करून भाष्य केलं आहे.
जो पक्ष महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात एक नगरसेवक निवडून आणू शकत नाही तो शिवसेना पक्ष बंगाल मध्ये निवडणुक लढणार नाही कारण ममता दीदी तिकडच्या वाघीण आहेत.. काय कारण सोधलय. शिवसेना कधीच खरं बोलणार नाही की इतर राज्यात १ आमदार काय १ नगरसेवक पण कधी निवडून आला नाही पण ते सांगणार कसं.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 5, 2021
त्यानंतर आता भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शिवसेनेच्या या माघारीवरून शिवसेनेची खिल्ली उडवली आहे. ‘जो पक्ष महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात एक नगरसेवक निवडून आणू शकत नाही तो शिवसेना पक्ष बंगाल मध्ये निवडणुक लढणार नाही कारण ममता दीदी तिकडच्या वाघीण आहेत.. काय कारण शोधलंय. शिवसेना कधीच खरं बोलणार नाही की इतर राज्यात १ आमदार काय १ नगरसेवक पण कधी निवडून आला नाही. पण ते सांगणार कसं’.अशी खोचक टीका निलेश राणे यांनी केली आहे.
ही बातमी पण वाचा : बॉलिवूडमधील दिग्गज दडपशाहीविरोधात गप्प का? संजय राऊत यांचा सवाल
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला