दरवर्षी मुंबईला स्विमिंग पूल करण्याऱ्या शिवसेनेचे नाव वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवावे – निलेश राणे

Nilesh Rane on shivsena over Mumbai rain

मुंबई :- मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबई शहर व उपनगरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पहिल्याच पावसात मुंबई व उपनगरांत पाणी तुंबल्यानं (Mumbai Rain) विरोधकांनी मुंबई महापालिका (Mumbai Mahanagarpalika) प्रशासनाला धारेवर धरलं आहे. भाजपनं तर नालेसफाईचा दावा फोल ठरला असून यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवरुन एक व्हिडीओ शेअर करत मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेवर (Shivsena) निशाणा साधला आहे. दरवर्षी मुंबईला स्विमिंग पूल करण्याऱ्या शिवसेनेचे नाव वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले पाहिजे, अशी खोचक टीका निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केली आहे.

100 टक्के नालेसफाई झाली असा दावा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केला मात्र आज हे चित्र आहे. दरवर्षी मुंबई शहराला स्विमिंग पूल करण्याचं काम जो पक्ष 25 वर्ष करतोय त्या शिवसेनेचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं पाहिजे. वाट लावली मुंबईची, अशी खोचक टीका करत निलेश राणेंनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button