मराठा आरक्षणासाठी कधी पवारसाहेबांचे अदृश्य हात जाणवले नाहीत; निलेश राणेंचा घणाघात

Nilesh Rane on sharad pawar over Maratha reservation

मुंबई :- पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जींना (Mamata Banerjee) मिळालेल्या यशात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अदृश्य हात होते, असा दावा राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला होता. दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मराठा समाजाला मोठा धक्का बसला असून आता राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि विरोधी पक्षातील भाजपाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी अदृश्य हाताचा उल्लेख करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं त्याकरिता कधी पवारसाहेबांचे अदृश्य हात जाणवले नाहीत; पण मराठ्यांना आरक्षण मिळूच नाही याकरिता अनेक वेळा त्यांची भूमिका जाणवली. ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाचे सगळ्या बाजूने तीनतेरा वाजवले. अशोक चव्हाण साधे केळी विकायच्या लायकीचे नाहीत, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

ही बातमी पण वाचा : आरक्षण न मिळण्याला तीन पक्षांचे सरकार आणि मुख्यमंत्री कारणीभूत : नारायण राणे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button