कराल काय स्वतःला अटक? निलेश राणेंची पुन्हा फटकेबाजी

Nilesh Rane

मुंबई :- रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांच्यावर झालेल्या अटकेच्या कारवाईनंतर भाजपा नेते अधिकच आक्रमक झाले आहे. इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. यानंतर भाजपाकडून (BJP) राज्यात आणीबाणीची आठवण करुन देणारी परिस्थिती निर्माण झाली असल्याची टीका सतत केली जात आहे. दरम्यान भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी एका जुन्या घटनेची आठवण करुन देत स्वतःला अटक करणार का? अशी विचारणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) केली आहे.

निलेश राणे यांनी उस्मानाबादमधील दिलीप ढवळे आत्महत्येसंबंधीच्या बातम्यांचे स्क्रीनशॉट ट्विटरवरून शेअर केले आहेत. “कराल काय स्वतःला अटक??? न्या स्वतःला फरफटत. दाखवून द्या न्याय सगळ्यांसाठी एक असतो,” असं निलेश राणे यांनी यावेळी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER