हे राज्य कुणाच्या बापाचं आणि ब्रॅन्डचं नाही, निलेश राणेंचा संजय राऊतांना टोला

Nilesh Rane - Sanjay Raut

मुंबई : ठाकरे हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा ब्रँड आहे. महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा, असे विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनाच्या माध्यमातून केले. त्यानंतर ठाकरेंचे कट्टर विरोधक असलेले भाजपा नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे, जगात ब्रँडची निर्मिती वस्तू विकण्यासाठी केली जाते, असा सणसणीत टोला निलेश राणे यांनी संजय राऊतांना लगावला.

निलेश राणे यांनी ट्वटिवरवरून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आपल्या ट्विटमध्ये निलेश राणे म्हणाले की, संजय राऊत म्हणतात की, पवार आणि ठाकरे महाराष्ट्राचे ब्रँड आहेत. त्यांना सांगा जगात ब्रँडची निर्मिती वस्तू विकण्यासाठी केली जाते. म्हणजे महाराष्ट्र विकला असं म्हणायचं का? महाराष्ट्राने अनेक लोकांना मोठं केलं. हे राज्य कुणाच्या बापाचं नाही. हे राज्य जनतेने मोठं केलं आहे. कुठल्या विकाऊ ब्रँडने नाही.

दरम्यान, निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमधून संजय राऊत यांनाही लक्ष्य केले आहे. संजय राऊतांसारखा भंगार माणूस कुणी नाही. कारण परिस्थिती अंगावर आली हे लक्षात आलं की, फक्त मराठी अमराठी वाद लावून द्यायचा की लोग आपोआप स्वत:ला वाटून घेतात आणि शिवसेनेचं काम सोपं होतं. मराठी माणसाने आतातरी यांची चाल ओळखावी आणि संधी मिळताच यांना आडवं करावं.