अजित पवारांचे ‘पहाटेचं सरकार’ पुन्हा चर्चेत; नीलेश राणेंच्या ट्विटवर राष्ट्रवादी काडीचीही किंमत देत नाही

Nilesh Rane-Mahesh Tapase

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर नीलेश राणे (Nilesh Rane)यांनी टीका केली आहे. त्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्याने प्रतिउत्तर दिले आहे .

भाजपने काही लोकांना बडबड करण्याचा ठेका दिला असून त्यातील एक कंत्राटदार नीलेश राणे आहेत. त्यांनी आता जे वक्तव्य केले आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेस काडीचीही किंमत देत नाही’, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) राणेंवर पलटवार केला आहे .

‘भाजपाने (BJP) लोकांच्या व शेतकऱ्यांच्या जीवाची होळी केली आहे. देशाची अर्थव्यवस्था लयाला नेली आहे. याकडे लक्ष जावू नये म्हणून काही लोकांना बडबड करण्याचा ठेका दिला आहे आणि निलेश राणे हे त्यातीलच एक आहेत’, असा टोला तपासे यांनी लगावला .

देवेंद्र फडणवीसांचं (Devendra Fadnavis) पहाटेचं सरकार वाचवण्यासाठी काही पोलीस अधिकारीच प्रयत्नशील होते, असा दावा शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या आजच्या अग्रलेखात करण्यात आला आहे. ‘पहाटेचे मुख्यमंत्री’ फडणवीसांची मर्जी राखण्यासाठी गुप्तचर खातंच काम करत होते , असा दावाही करण्यात आला आहे. यावर निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून अजित पवार आणि राष्ट्रवाद काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला .

‘शिवसेना (Shivsena) नेहमी पहाटेच्या भाजप-राष्ट्रवादी (BJP-NCP) सरकारच्या शपथविधीवर टीका करते. मग अजित पवार पहाटे पहाटे राजभवनावर मॉर्निंग वॉकसाठी आले होते काय? त्यांच्याजवळ आमदार टिकले नाही म्हणून ते परत गेले. शरद पवार यांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित पवारांनीच केला आहे’, असे खोचक ट्विट नीलेश राणे यांनी केले. राणे यांच्या याच ट्विटवरून राष्ट्रवादीच्या नेत्याने त्यांना खडेबोल सुनावले आहे .

ही बातमी पण वाचा : बीडमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासाठी शरद पवार यांच्याकडून इतिहासाची पुनरावृत्ती?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER