‘अधिकाऱ्यांची एवढी मस्ती वाढली आहे की…’ भंडारा घटनेवरून निलेश राणेंची टीका

Nilesh Rane -CM Uddhav Thackeray

मुंबई :- भंडारा (Bhandara) जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत १०  नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत १७ बालकांपैकी ७ जणांना वाचविण्यात यश आले  आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. तसेच या घटनेच्या तत्काळ चौकशीचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहे.

भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनिटला आग लागून झालेल्या बालकांच्या  मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे, असे  अजित पवारांनी (Ajit Pawar) सांगितले. तसेच या घटनेबाबत तत्काळ चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहितीही अजित पवार यांनी ट्विटरद्वारे दिली.

मात्र भाजपाचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, भंडारा जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या इमारतीचं फायर ऑडिट झालेलं नाही हे लक्षात आलं. त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. मुळात ह्यांच्या चौकशांना कोणीही भीक घालत नाही. अधिकाऱ्यांची एवढी मस्ती वाढली आहे की, ते कुणालाच जुमानत नाहीत, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER