…तर तुमची घमंड उतरविल्याशिवाय राहणार नाही, निलेश राणेंचा अजित पवारांना इशारा

Nilesh Rane - Ajit Pawar

मुंबई : एकीकडे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) बलात्काराचे आरोप झाले आहेत. तर दुसरीकडे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या जावयाला ड्रग्स प्रकरणात अटक केली गेली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाची मोठी कोंडी झालेली पाहायला मिळते आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न भाजपाकडून (BJP) करण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर भाजपाचे खासदार नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी देखील जितके गुन्हेगार एका जेलमध्ये नसतील तितके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे, अशी जहरी टीका केली होती.

निलेश राणे यांच्या या टीकेनंतर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील प्रत्युत्तर दिलं होतं. निलेश राणे वाट्टेल ते बोलतात आणि त्यावर मी व्यक्त व्हायचे का, असं अजित पवारांनी सांगितले. तसेच त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असं विधानही अजित पवार यांनी पुण्यातील सर्किट हाऊस येथे बोलताना केलं होत. अजित पवारांच्या या विधानानंतर आता पुन्हा निलेश राणे यांनी ट्विट करत उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

ही बातमी पण वाचा : इतके गुन्हेगार मिळून एका जेल मध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत – निलेश राणे

निलेश राणे म्हणाले की, फार कमी नेते आहेत की ज्यांना महाराष्ट्रमध्ये अनेक वर्ष मंत्रीपदे मिळाली. मात्र तरीपण महाराष्ट्राच्या विकासामध्ये काही परिणाम झाला नाही. त्यामध्ये अजित पवारांचे नाव घ्यावं लागेल, असं निलेश राणे यांनी सांगितलं. अजित पवारसाहेब भाषा नीट करा नाहीतर हा निलेश राणे तुमची घमंड उतरविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही निलेश राणे यांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER