अन्वय नाईक आणि ठाकरेंमध्ये आर्थिक देवाणघेवाण? राणेंचा खळबळजनक आरोप

CM Thackeray family-Nilesh Rane

सिंधुदुर्ग : अन्वय नाईक (Anvay Naik) प्रकरणी रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला (Arnab Gosami) अटक केली आहे. अर्णबवरील ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप करत भाजप नेत्यांनी निषेध केला. तर, राज्यभरात अनेक ठिकाणी भाजपतर्फे आंदोलन देखील करण्यात आलं. या प्रकरणात ठाकरे कुंटुबियांकडून आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचा आरोप भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आज केला आहे. याबाबत निलेश राणे यांनी टि्वट करून हा आरोप केला आहे.

निलेश राणे यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. अन्वय नाईक यांच्याबद्दल माहिती काढत असताना त्यांनी एक प्रॉपर्टी ठाकरे कुटुंबाला विकली आहे. आजही प्रॉपर्टी कार्डवर त्याची नोंद आहे. युवा सेनेचा एक शेंबडा हे प्रकरण मराठी विरुद्ध अमराठी करायचा प्रयत्न करतोय, त्याला माहित नाही हे प्रकरण कधी ठाकरेंच्या अंगाशी येईल कळणार नाही. असा गंभीर दावा निलेश राणे यांनी केल्यामुळे आता हे प्रकरण काही वेगळं वळण घेणार का? जर अन्वय नाईक यांच्या नैराश्यामागे काही वेगळं कारण असेल तर त्यांना न्याय मिळणार का? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER