निलेश राणे यांची भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर निमंत्रित सदस्य म्हणून निवड

Nilesh Rane

रत्नागिरी/प्रतिनिधी : भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीवर निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी कार्यकारिणी नुकतीच जाहीर केले आहे. यात माजी खासदार निलेश राणे निवड केली आहे. यात शोभाताई फडणवीस, सुरेश हावरे, मुकुंदराव कुलकर्णी, रघुनाथ कुलकर्णी, सुधाकर देशमुख, डॉ.सुनिल देशमूख, माजी आमदार मधु चव्हाण यांचाही समावेश आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली आहे ती योग्य पद्धतीने निभावून पक्ष वाढीसाठी नेहमीच प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया निलेश राणे यांनी यावेळी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER