नाक्यावरचे टपोरीही स्वतःला वाघ समजतात; निलेश राणेंची संजय राऊतांवर विखारी टीका

Nilesh Rane-sanjay-raut

मुंबई : ‘मोदींनी जर आम्हाला आदेश दिला तर आम्ही पुन्हा वाघाशी दोस्ती करायला कधीही तयार आहोत.’ असं सूचक विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत मिस्कील टीका केली. वाघाशी मैत्री कधीही होत नाही; वाघ ठरवतो मैत्री कोणाशी करायची, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना दिलं. त्यावर आता भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी अत्यंत खोचक शब्दात संजय राऊतांना लक्ष्य केले. नाक्यावरती उभे राहणारे टपोरी पण स्वतःला वाघ समजतात, असे निलेश राणे म्हणाले आहेत.

नाक्यावरती उभे राहणारे टपोरी पण स्वतःला वाघ समजतात. वाघ-बकरी नावाची चहासुद्धा येते आणि टायगर नावाचा बाम पण येतो. स्वतःला वाघ म्हटल्यावर वाघ झाले असते तर जंगलातल्या वाघांची किंमत संपली असती. लुक्क्यांना जास्त सवय असते स्वतःला वाघ म्हणायची, अशा शब्दांत निलेश राणे यांनी संजय राऊतांचा समाचार घेतला.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button