‘आव्हाडांसारखी मंडळी मंत्रिमंडळात असेपर्यंत लुक्केगिरी सुरुच राहणार’, निलेश राणेंची टीका

Nilesh Rane-Jitendra Awhad

मुंबई :- आपल्याला इंजेक्शनची गरज आहे, त्यामुळे बीडीआर कंपनीला महाराष्ट्रात (Maharashtra) रेमडेसिविरचा पुरवठा करण्याची तातडीने परवानगी द्यावी, असा आग्रह महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमधील एका मंत्र्याने धरला होता. मात्र बीडीआर कंपनीने तोंडी विनंती केलेली आहे. ती गृहीत धरून त्यांना आम्ही परवानगी देत आहोत, असे पत्र एफडीए आयुक्त अभिमन्यू काळे यांनी काढले होते. तसेच कागदपत्रे तुम्ही तातडीने सादर करावीत, असेही त्या पत्रात नमूद करण्यात आले होते. यानंतर त्यांची काल रात्री तडकाफडकी बदली करण्यात आली होती. आणि यावरुनच भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी थेट गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचे नाव घेत टीकास्त्र सोडले आहे.

‘जो पर्यंत आव्हाड सारखी मंडळी मंत्रिमंडळात आहेत तो पर्यंत अधिकाऱ्यांच्या बदल्या, ड्रामा आणि लुक्केगिरी होतच राहणार’ असे ट्विट करत निलेश यांनी टीकास्त्र सोडले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button