…पण त्यांचा अंत वाईट असतो; निलेश राणेंचा पवारांना टोला

मुंबई :- मागील विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकीय इतिहासात मोठ्या घडामोडी घडल्या . मात्र या सत्तासंघर्षाच्या काळात ७२ तास खूप महत्त्वाचे ठरले, ते म्हणजे अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत पहाटे शपथ घेत सरकार स्थापन केले. मग प्रश्न पडतो की, भाजपासोबत (BJP) जाण्याचा निर्णय अजित पवार (Ajit Pawar) यांचा वैयक्तिक होता की शरद पवारांनीच (Sharad Pawar) तो प्लॅन रचला होता.

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला सत्तेत येऊन वर्ष झाला आहे, मग या घडामोडीत महत्त्वाची भूमिका बजावणारे देवेद्र फडणवीस यांनी केलेला गौप्यस्फोट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. राष्ट्रवादीकडूनच भाजपाला सत्तास्थापनेसाठी प्रस्ताव आला होता, शरद पवारांसोबत चर्चा झाली होती, कोणाला कोणं खातं द्यायचं, पालकमंत्री कोण, महामंडळ वाटप कसं होणार? याबाबत सविस्तर चर्चा झाली होती, राष्ट्रपती राजवट हटवण्याची शिफारस हे सगळं शरद पवारांना माहिती होते असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला. मात्र यावर कोणीही राष्ट्रवादीचा नेता खुलासा देण्यासाठी पुढे आला नाही.

यावर माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विटमधून टीका केली आहे. निलेश राणे म्हणतात की, गद्दारी करून ठाकरे सरकारमध्ये बसलेत त्यांना अपेक्षित यश कधीच मिळणार नाही, हेराफेरी करणाऱ्यांना सुरूवातीला यश मिळतं, पण त्यांचा अंत वाईट असतो, स्वत:ला मोठे जाणते आणि आम्हाला सगळं कळते असे समजणारे नेते येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर दिसणार नाही असे त्यांनी म्हटलं आहे.

ही बातमी पण वाचा : संज्याची राज्याबाहेर जाऊन लाज घालवायची सवय जात नाही, निलेश राणेंचा टोमणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER