आघाडी सरकारचा आणि हिंदू धर्माचा काहीही संबंध राहिलेला नाही – निलेश राणे

Nilesh Rane

मुंबई :- दिवाळी (Diwali) पाडव्याच्या मुहूर्तावर ठाकरे सरकारने (Thackeray Government) लॉकडाऊनमुळे (Lockdown) बंद असलेली राज्यातील मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला. ठाकरे सरकारच्या आदेशानंतर सोमवारपासून सर्वच धार्मिक स्थळे उघडी करण्यात आली. त्यानंतर भाजपने (BJP) राज्यातील विविध देवस्थाने तसंच मंदिरांच्या बाहेर मोठ्या जल्लोशात आनंदोत्सव साजरा केला. भाजपने आनंदोत्सव साजरा केल्याने सरकारमधील काही मंत्री, नेत्यांनी भाजपवर टीका केली. त्यांच्या या टीकेला भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

मंदिर उघडल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सोमवारचा दिवस उत्साहात साजरा केला. काही महाविकास आघाडी सरकारचे (Mahavikas Aghadi) नेते रिकामटेकडे टीका करु लागले की भाजपने श्रेय घेऊ नये. मुळात महाविकास आघाडी सरकारचा आणि हिंदू धर्माचा काही संबंध शिल्लक राहिलेला नाही, अशी घणाघाती टीका निलेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER