शिवसेनेचे स्टार कॅम्पेनर्स बिहारमध्ये जाऊन उरलीसुरली स्वतःची अब्रू घालवणार : निलेश राणे

nilesh Rane & Shivsena

मुंबई :- बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने चांगलीच कंबर कसली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये उमेदवारांना निवडून आणण्याचे लक्ष्य असलेल्या सेनेने 20 जणांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), शिवसेना खासदार संजय राऊत यांचा समावेश आहे. शिवसेनेची स्टार प्रचारकांची यादी जाहीर होताच भाजप नेते निलेश राणे यांनी खिल्ली उडवली आहे.

या स्टार कॅम्पेनर्स बिहारमध्ये जाऊन उरलीसुरली स्वतःची अब्रू घालवणार. महाराष्ट्र सोडून ज्या ज्या राज्यात शिवसेनेने उमेदवार उभे केले त्या राज्यांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट देखील वाचले नाही हा इतिहास आहे, अशी टीका निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केली आहे .

दरम्यान शिवसेनेने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत एकूण 20 नेत्यांची नावे आहेत. यात सुभाष देसाई, संजय राऊत (Sanjay Raut), चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, विनायक राऊत, अरविंद सावंत, गुलाबराव पाटील, राजकुमार बाफन, प्रियांका चतुर्वेदी, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, सुनिल चिटणीस, योगराज शर्मा, कौशलेंद्र शर्मा, विनय शुक्ला , गुलाबचंद दुबे, अखिलेश तिवारी, अशोक तिवारी यांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER