‘चायना मेड’ ठाकरे सरकारचे शिवाजी महाराजांवरील प्रेमही डुप्लिकेट : निलेश राणे

Nilesh Rane - Chhatrapati Shivaji Maharaj - Uddhav Thackeray

सिंधुदुर्ग :- भाजप (BJP) नेते आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी सरकारचा मनाई आदेश झुगारून आज (19 फेब्रुवारी) शेकडो भाजप कार्यकर्त्यांसह सिंधुदुर्ग किल्यावर शिवजयंती (Shiv Jayanti) मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. ठाकरे सरकार (Thackeray Government) हे चायना मेड असलेले डुप्लिकेट सरकार असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला.

निलेश राणे म्हणाले, शिवनेरीवर सामान्य शिवभक्तांना 144 कलम लागू केले आणि मुख्यमंत्री, उपमुख्यामंत्री हेलिकॉप्टरने गडावर पोहचले. शिवभक्तांचा हा अपमान महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. याठिकाणी शिवरायांच्या पालखीला शिवाजी महाराजांच्या गादिचे वंशज छत्रपती संभाजी राजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांना साधा हातही लावू दिला नाही. हा छत्रपतींच्या गादीचा मोठा अपमान आहे. त्यामुळे अशा लोकांच्या पाठीमागून संभाजी राजे यांनी फरफटत जाऊ नये. उभा महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा आहे.

शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी या सरकारकडे पैसे नाहीत हे दुर्दैव आहे. या सरकारचे शिवाजी महाराजांवरचे प्रेम डुप्लिकेट आहे. इतकी वर्ष होऊनही शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी हे सरकार पैसे उपलब्ध करु शकलेले नाही. जाहीर केलेले पैसेही द्यायला सरकारला जमत नाही. कोरोनाचे कारण पुढे करत आहेत. शिवरायांबद्दलचे शिवसेनेचे प्रेम हे केवळ दाखविण्यासाठी आणि लोकांना मूर्ख बनविण्यासाठी आहे. हा त्यांचा निवडणुकीचा अजेंडा आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला केव्हाच माहिती झालं आहे, असंही निलेश राणे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER