‘जे परीक्षा न देताच मुख्यमंत्री झाले, त्यांनी हा निर्णय घेणं…’ निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

Nilesh Rane -CM Uddhav Thackeray

मुंबई :- कोरोनाच्या संकटापासून कधी मुक्तता मिळेल याबाबत अनिश्चिततेचा फटका पदवी-पदव्युत्तरच्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना बसू नये, यासाठी परीक्षांऐवजी आतापर्यंत मिळवलेल्या गुणांची सरासरी काढून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जाहीर केला. रविवारी राज्यातील जनतेला संबोधित करताना त्यांनी राज्य सरकारने घेतलेल्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांवर भाष्य केलं. यावरून आता भाजपा नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

“जे परीक्षा न देताच मुख्यमंत्री झाले, त्यांनी हा निर्णय घेणं हे काही नवल नाही.” असं म्हणत निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची अनिश्चितता पाहता अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याच्या घेतलेल्या निर्णयावरून त्यांनी मुख्यमंत्र्यांवर ट्विटरवरून टीका केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER