करून दाखवलं… कोरोनाबाधितांच्या संख्येत जगात महाराष्ट्र पाचव्या स्थानी; निलेश राणेंचा शिवसेनेला टोमणा

Nilesh Rane-Uddhav Thackeray

मुंबई : राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या १० लाखांजवळ पोहचली आहे. यावरून आता भाजपा (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शिवसेनेला (Shivsena) ‘करून दाखवलं’ असं म्हणत टोला लगावला आहे.

निलेश राणे  ट्विटमध्ये म्हणाले की , शिवसेनेने करून दाखवलं… कोरोनाबाधितांच्या संख्येत महाराष्ट्र जगात पाचव्या स्थानी. रुग्णसंख्या १० लाखांच्या जवळ. हे सरकार विसरले की कोरोनाशी लढायचे होते कंगनाशी नाही.” असे म्हणत राणे यांनी सरकारवर निशाणा साधला.

ही बातमी पण वाचा : लवकरच पेंग्विन ‘या’ केसमध्ये सापडणार; निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER