विनायक राऊत म्हणजे कोकणातला कोरोना व्हायरस : निलेश राणे

Nilesh Rane-Vinayak Raut

मुंबई :- नाणार रिफायनरीच्या मुद्द्यावरून कोकणात सध्या वादंग पेटले आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नाणार विरोधात दलाली करणाऱ्यांना चपलेने झोडा, असे आव्हान केले होते. नाणारच्या या वादात आता भाजपा नेते निलेश राणे यांनीदेखील उडी घेतली आहे. विनायक राऊत म्हणजे कोकणातला कोरोना व्हायरस असल्याची खोचक टीका त्यानी केली. त्यांनी ट्विटरवरून राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

नाणार विरोधात दलाली करणाऱ्यांना चपलेनी झोडा. तसंच मेळाव्याला कोणी शिवसैनिक गेल्यास त्याच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचं राऊत म्हणाले होते. नाणारला समर्थन करणाऱ्या शिवसेना जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर यांची हकालपट्टी करण्यात आल्याचेही राऊत यांनी सांगितले होते. या प्रकरणावरून आता निलेश राणे यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

“हा खासदार नाही कोकणातला कोरोना व्हायरस आहे. जिथे जातो तिथे घाण करतो. कालच्या नाणार रिफायनरी प्रकल्प समर्थनाच्या सभेत शिवसैनिक जास्त होते. परवा जी धमकी मीटर चोर राऊत देऊन गेला होता ती नेहमप्रमाणे फुसकी ठरली,” अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

उदय सामंत म्हणजे ‘पैसा दिसेल तिकडे हात मारणारा चोर’ : निलेश राणे


Web Title : Nilesh rane criticise vinayak raut means corona virus

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)